॥ अभंग ७ ॥
7.
॥ अभंग ७ ॥
निर्गुणाचें भेटी आलो सगुणासंगें ।
तंव झालो प्रसंगी गुणातीत ॥ १ ॥
मज रूप नाही नांव सांगू काई ।
झाला बाई बोलू नये ॥ २ ॥
बोलता आपली जिव्हा पै खादली ।
खेचरी लागली पाहता पाहता ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी पडली कैसी ॥ ४ ॥
