वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग ६ ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090223 · अभंग क्र. ६

6.
॥ अभंग ६ ॥

सरितेचा ओघ सागरी आटला ।
विदेही भेटला मनामन ॥ १ ॥
कवणाचे सांगाते पुसावया कवणाते ।
सांगतो ऐक ते तेथे कैचें ॥ २ ॥
नाही दिवस राती नाही कुळ याती ।
नाही माया भ्रांति अवघेची ॥ ३ ॥
म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा ।
सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग