छत्र चामरे उभा सन्मु
1073.
छत्र चामरे उभा सन्मुख भोंवती | रुक्माईचा पति मध्यभागी ॥१॥
निंबे आणि नारळ गोण्याची पोफळे | उदंड तिही केळे आणियली ॥२॥
आणिक बहुता परी घेतली सामुग्री | पीत पीतांबरी मृगछाला ॥३॥
भगवी आभरणे घेतले भस्म | अंगे परब्रह्म साह्य त्यासी ॥४॥
नामा म्हणे स्वामी तिष्ठताती अंगे | मेळविली सांगे साहित्यासी ॥५॥
