उगमापासुनी गंगा सागर
1074.
उगमापासुनी गंगा सागरासी गेली | काय दोन जाली उदके त्यांची ॥१॥
तैसा ज्ञानदेव जाला अनुभव | काय आम्हा देव दुरावला ॥२॥
सरिता सरोवराचे एके ठायी झरे | लहान थोर सारे स्वरूपी माझ्या ॥३॥
रुक्मादेवीवरे उगविले गाबाळ | संत कृपाळ डुल्लताती ॥४॥
नामा म्हणे येणे मोहिले चित्त | राहिले तटस्थ चौघेंजण ॥५॥
