वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

अंतर बाहेर कळले स्वर

🙏 4. संत नामदेव · ABH-081745 · अभंग क्र. १०७२

1072.
अंतर बाहेर कळले स्वरूप | स्वये नंदादीप उजळिला ॥१॥
येणे जाणे कोठे योगी पहा अवीट | सान वैकुंठ करुनि ठेवी ॥२॥
ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञान | वाया तुम्ही शीण करू नका ॥३॥
घटाचिया योगे प्रतिबिंब भासे | काय म्हणे नासे निरालंब ॥४॥
दर्पणाचे योगे दुसरे देखणे | काय मुखे दोन त्यांसी जाली ॥५॥
दृश्याचियामुळे जीव दिसे येथे | काय पा परमार्थ विटंबले ॥६॥
तंतूचियामुळे पटाला विस्तार | काय निराकार वाया गेले ॥७॥
रुक्मादेवीवरे केले समाधान | नामा म्हणे मौन धरुनि ठेले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग