तेथे सुखाची वसती । ग
11.
तेथे सुखाची वसती । गाती वैष्णव नाचती ।
दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरिनामे ॥१॥
दोषा झाली घे घे मारी । पळती भरले दिशा चारी ।
न येती माघारी । नाही उरी परताया ॥२॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा ।
विटोनि निर्गुणा । रूप धरिले गोजिरे ॥३॥
पोट सेविता न धाये । भूक भुकेलीच राहे ।
तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥४॥
