ऐसा हा देवाने थोर पव
342.
ऐसा हा देवाने थोर पवाडा केला । पूर्व अवतारी झाला हयग्रीव ॥1॥
मग अंबऋषिसाठी पडियेला संकटी । मच्छ झाला पोटी समुद्राच्या ॥2॥
होउनी कच्छप पर्वत धरिला । वराहे मारिला दैत्य भार ॥3॥
तयाचा सहोदर मृत्यु नाही ऐसा वर । तेव्हा नारसिंह झाला अवतार ॥4॥
अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन । भार्गव तो निधान दाशरथी ॥5॥
होऊनिया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला सखा माझा ॥6॥
लीला अवतारी हरि करी खेळ नाना । म्हणे जनी जाणा तै मी होत्ये ॥7॥.
.......... {}..........
प्रारब्धगती
