वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079789 · अभंग क्र. ३९०१

3901.
(बाळक्रीडा अभंग)
गाती ओंव्या कामे करिता सकळे । हालविता बाळे देवावरी ॥१॥
ॠद्धिसिद्धी दासी ‌द्वारी ओळंगती । सकळ संपत्ति सर्वा घरी ॥२॥
घरी बैसलिया जोडले निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥
गोविंदे गोविंद केले लोकपाळ । चिंतने सकळ तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
कोणतेही काम करत असताना पाळण्यातील बाळ हलवत असताना देखील व्दारकेतील लोक देवाचेच गीत व ओव्या गात होते. देवाने स्थापन केलेल्या व्दारका नगरीमध्ये सर्वांच्या घरी सर्व प्रकारची संपत्ती असून रिध्दी, सिध्दी त्यांच्या दारामध्ये दासी होती व लोटांगण घेऊन त्यांची सेवा करत होती. कृष्णरुपी निधान त्यांना घरी बसल्या बसल्याच प्राप्त झाले होते व कृष्णाचेच कीर्तन व्दारकेतील स्त्री, पुरुष करत होते. ज्यांना गोविंदाची संगती झाली ते स्त्री, पुरुष कोणत्याही जातीचे असो ते धन्य धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदाने सर्व लोकांना गोविंदरुप केले कारण सर्व लोक गोविंदाचेच चिंतन करत होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग