(बाळक्रीडा अभंग)
3900.
(बाळक्रीडा अभंग)
रचियेला गांव सागराचे पोटी । जडोनि गोमटी नानारत्ने ॥१॥
रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति नानाकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हाती । मंदिरे निगुती उभारिली ॥३॥
उभारिली दुर्गे दारवंटे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥
शोभले उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरी ॥५॥
आले नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥
निवडीना याति समानचि केली । टणक धाकुली नारायणे ॥७॥
नारायणे दिली अक्षई मंदिरे । अभंग साचारे सकळांसि ॥८॥
सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिले ते देवे न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥
बळबुद्धीने ती देवाच सारिखी । तुका म्हणे मुखी गाती ओंव्या ॥११॥
अर्थ :
समुद्राच्या बेटावर विविध रत्नांनी जडित असलेल्या व्दारकेची रचना देवाने केली. प्रत्येक खणाखणाच्या भिंतीला विविध प्रकारचे रत्न लावण्यात आले होते त्यामुळे खूप सारे दिवे लागले असे वाटत होते. सर्व प्रकारची कला देवाच्या हातात होती त्यामुळे देवाने तेथे विविध प्रकारचे मंदिरे देखील उभारली होती. अशा प्रकारे देवाने प्रचंड अशा वेशी, शिखरे, आवारे स्थापन केली व घरामध्ये कोटी सुर्याचा प्रकाश समावलेला शोभुन दिसत होता. अशा प्रकारे सागरामध्ये ते गांव उत्तम प्रकारे शोभून दिसत होते व सर्वांसोबत हरी तेथे आले. उदार आणि शूरांचाही मुकुटमणी असलेला नारायण व्दारका नगरीत आला. लहान मोठे कोणीही असले कोणत्याही जातीचे असले तरीही नारायणाने सर्वांना समान केले. नारायणाने सर्वांना कधीही न भंगणारे अक्षय असे घरे दिले. त्या व्दारकेतील ना
