जेणे पृथ्वीसी धरीले
376.
जेणे पृथ्वीसी धरीले ।
सूर्या प्रकाश उटिले ।
चंद्रबिंबी अमृत ठेविले ।
तेणे निववीत जगा तो ॥१॥
गगना पवाडू दिधला ।
मेरुस्तंभ उभारिला ।
गती पवनही उडविला ।
दाही दिशा फिरतसे ॥२॥
जेणे अग्नीसी दीपन ।
जीवनी ठेविले जीवन ।
आपोनिधी जळे पूर्ण ।
क्षीरे सागर भरियेला ॥३॥
नाना अन्नी ठेविली तृप्ति ।
नाना परिमळ पुष्पयाती ।
नाना रसस्वाद फळाप्रति ।
एवढी युक्ती कोणाची ॥४॥
अपार चांदणे फुलोरा ।
जेणे शोभविले अंबरा ।
पर्जन्याच्या करुनी धारा ।
जेणे पिकविले धरणीते ॥५॥
जेणे इ्रद्रादिका देवा ।
पदी स्थापुनी वांटिल्या सेवा ।
जेणे मर्दुनी दैत्य दानवा ।
केला सांभाळ भक्तांचा ॥६॥
जो या प्राणाते चाळिता ।
जीवा जिवणे ज्याचिया सत्ता ।
मनी संकल्पाचिया चळथा ।
उठवी सत्ता हे कोणा ॥७॥
जो या श्रुतीते पढविता ।
परमामृमाते जीववीता ।
सूर्या अंजन लेवविता ।
अवधी सत्ता हे ज्याची ॥८॥
चराचर व्यापूनिया उरला ।
उभा विटेवरी ठाकला ।
निळा म्हणे तेणे केला ।
बुध्दी माझीये प्रकाश ॥९॥
