वोरसोनिया भक्तासाठी
377.
वोरसोनिया भक्तासाठी ।
धावे वैकुंठीहुनी उठाउठी ।
हात ठेऊनिया कटी ।
उभा व्दारी ठाकला ॥१॥
देखोनिया पुंडलिकासी ।
वास केला तयापाशी ।
अवलोकूनिया निजभक्तांसी ।
परम विश्रांती पावला ॥२॥
जे जे येती दर्शनाशी ।
भुक्तिमुक्ति वांटी त्यासी ।
गाती वानिती जे यासी ।
त्या ने वैकुंठासी निज गजरे ॥३॥
नेघे त्यांची अतिशय सेवा ।
जिही आळविले याचिया नांवा ।
धावोनि त्यांचा करी कुडावा ।
आपुलिया गावा ने त्यासी ।
॥४॥
न म्हणेचि दिवसरात्री काही ।
सदा भक्ताचिये वाही ।
निळा म्हणे त्यांच्याची देही ।
प्रगट नव्हे निराळा ॥५॥
