वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

गाते श्रोते आणि पाहा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075059 · अभंग क्र. १५०

150.
गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदी दुश्चिते ॥
सोहंभावी पूर्ण ज्ञाते । या सकळांते विनवणी ॥
करा विठ्ठल स्मरण । नामरुपी अनुसंधान ।
जाणोनि भक्ता भवलक्षण । जघनप्रमाण दावितो ॥
पुंडलिकाच्या भावर्था । गोकुळीहुनि जाला येता ।
निजप्रेम भक्ति भक्ता । घ्या घ्या आता म्हणतसे ॥
मी माझे आणि तुझे । न धरी टाकी परते ओझे ।
भावबळे फळती बीजे । बापरखुमादेविवरु विठ्ठली ॥

अर्थ :
गाणारे, श्रोते, आणि पाहणारे चतुर, विनोदी व सोहंभावामुळे झालेली ज्ञानी या सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही सर्व विठ्ठल स्मरण करा. आपले अनुसंधान त्या नामाशी जोडा. हे भक्तांनो हा भवसागर त्या श्री विठ्ठलाच्या कमरे येवढा आहे हे तो कमरेवर हात ठेऊन दाखवतो. तो पुंडलिकाच्या भावाने गोकुळीहुन आला आहे व ते निजप्रेम सर्व भक्तांना घ्या घ्या म्हणतो. मी, माझे व तुझे हे ओझे टाकुन द्या माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल ह्यांचा चरणी तो भाव ठेवा असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग