वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

अनंत जुगाचा देव्हारा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073677 · अभंग क्र. ७

7.
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधाचा घुमारा ।
अवचित भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥१॥
शुद्ध सत्वाचा कवडा मोठा । बोध बिरडे बांधला गांठा ।
गळा वैराग्याचा पट्टा । वाटा दाऊ भक्तीच्या ॥२॥
हृदय कोटंबा सागाते । घोळ वाजवू अनुहाते ।
ज्ञानभांडाराचे पोते । रिते नव्हे कल्पाती ॥३॥
लक्ष चौर्‍यांशी घरे चारी । या जन्माची केली वारी ।
प्रसन्न झाला देव मल्हारी । सोहंभावी राहिलो ॥४॥
या देवाचे भरता वारे । अंगी प्रेमाचे फेपरे ।
गुरु गुरु करी वेडेचारे । पाहा तुके भुंकविले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग