वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मागीलही जन्म आठवती क

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076288 · अभंग क्र. १७०

170.
मागीलही जन्म आठवती काही ।
त्वरा जाली देही मृत्युवेळे ॥१॥
यालागी राहिले सांगणे मागील ।
साधने प्रबळ होती खरी ॥२॥
देह-प्राक्तनाचे भोगिले संचित ।
स्वस्वरूपे चित्त भूमिका क्रमी ॥३॥
सप्तही भूमिका वैराग्य सांगाती ।
स्वधर्म विरक्ति संपादिली ॥४॥
विदेह-अवस्था भूमिका सातवी ।
ते येथे अनुभवी साधियेली ॥५॥
सरले संचित प्राक्तन देहाचे ।
माझी मज साची साक्ष याची ॥६॥
तरा जन्म सर्व भूमिका साधिल्या ।
वृत्तिही राहिल्या निमग्नता ॥७॥
बहेणि म्हणे काही न धरू संदेह ।
विवेके विदेहदशा आली ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग