वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 71. गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

जो निर्गुण निराभास ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084802 · अभंग क्र. १८९८

1898.
जो निर्गुण निराभास । जेथुन उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांस आदिगुरु ॥१॥
तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्रीपाद प्रसादीत । श्रीअवधुत दत्तात्रय ॥२॥
दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगीं ॥३॥
जनार्दन कृपेस्तव जाण । समुळ निरसलें भवबंधन । एका जनार्दनी शरण । झाली संपुर्ण परंपरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग