वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079411 · अभंग क्र. ४०८६

4086.
(आरत्या)
अवतार गोकुळी हो जन तारावयासी । लावण्यरूपडे हे तेज पुंजाळरासी ।
उगवता कोटि बिंबे रवि लोपले शशी । उत्सव सुरवरा मही थोर मानसी ॥१॥
जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता । आरती ओंवाळीन तुम्हा देवकीसुता ।
जय देवा कृष्णनाथा ॥धृपद॥
वसुदेवदेवकीची बंद फोडीली शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचे बाळ ।
दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राज्यया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥
राखता गोधने हो इंद्र कोपला भारी । मेघ जो कडाडिला शिळा वर्षता धारी ।
राखिले गोकुळ हे नखी धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥
कौतुक पाहावया माव ब्रह्मयाने केली । वत्सेंही चोरोनिया सत्यलोकासि नेली ।
गोपाळ गाईवत्से दोन्ही ठायी राखीली । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥
तारिले भक्तीजना दैत्य निर्दाळूनि । पांडवा साहकारी आडल्या निर्वाणी ।
गुण मी काय वर्णु मति येवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव मागे चरणी ॥५॥

अर्थ :
सामान्य लोकांचा उध्दार करण्यासाठी देवाने गोकुळात अवतार घेतला आहे अशा या हरीचे रुप अतिशय लावण्य असून तेज:पुंजाची राशीच आहे. हरीच्या त्या तेजापुढे कोटी सूर्य चंद्र जरी उगवले तरी लोपले जातील अशा या हरीचा पृथ्वीवर गोकुळामध्ये जन्म झाला याचा थोर उत्सव सर्व देव देवतांना होत आहे. हे देवा कृष्णनाथा, रुक्मिणीकांता, देवकीसुता मी तुमची आरती ओवाळीन हे कृष्णनाथा तुमचा जयजयकार असो. देवा वसुदेव आणि देवकी कारागृहात असताना तुम्ही त्यांची सुटका केली विश्वजनिता तुम्ही आहात तरी देखील तुम्ही त्यांच्या पोटचे बाळ झालात. देवा तुम्ही सर्व दैत्यांचे काळ झालेला अ

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग