साधन ते साधा वाचे ।
872.
साधन ते साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचे ॥१॥
तेणे तुटेल बंधन । वाचे गाता रामकृष्ण ॥२॥
नामासरसींवाजे टाळी । महा पापा होय होळी ॥३॥
हा तो पुराणीं निश्चय । नाम निशिदिनीं गाय ॥४॥
आवडीनें नाम गाय । एका जनार्दनी वंदी पाय ॥५॥