वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 59. ब्रह्मदेव गर्व परिहार

मेघ: शाम वर्ण झालासी

🙏 4. संत नामदेव · ABH-083077 · अभंग क्र. १०६

106.
मेघ: शाम वर्ण झालासी सगुण । कार्य आणि कारण तुज नमो ॥१॥
गुंजाहार गळा मयुरपुच्छे वेंटी । कृपाळु जगजेठी तुज नमो ॥२॥
वनपुष्पमाळा अपाद शोभती । लक्षुमीच्या पति तुज नमो ॥३॥
वेणू वाजविसी गायी त्या चारीसी । न कळे कोणासी तुझी लीला ॥४॥
हाती तुझ्या कवळ शोभे पीतांबर । चरण सुंदर तुज नमो ॥५॥
घेवोनी अवतार दुष्टांसी मारिसी । भक्तांसी रक्षिसी निरंतर ॥६॥
रावण कुंभकर्ण मारीसी आत्मारामा । सोड विले आह्मा बंदीहुनी ॥७॥
तुझे मी बालक वेडे अविचारी । नामा ह्मणे करी कृपा आता ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग