वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 59. ब्रह्मदेव गर्व परिहार

श्रवणमात्रे जळती पाप

🙏 4. संत नामदेव · ABH-083069 · अभंग क्र. १०५

105.
श्रवणमात्रे जळती पापाचे पर्वत । ऐके ब्रह्मगीत शूक ह्मणे ॥१॥
धरूनि विश्वास करी जो पठण । तरेल तो जाण भवसिंधू ॥२॥
आपण तरेल नव्हे हे नवल । कुळे उद्धरील सप्तही तो ॥३॥
एकेक अक्षर निर्दळील महा पाप । करा याचा जप शौनक हो ॥४॥
नाम घेता धांवे अनवाणी पाय । कोमळ ह्लदय कृष्णाजीचे ॥५॥
न विचारिता याति कुळ अमंगळ । न पाहे काळ वेळ धांव घेई ॥६॥
शरणागता नेदी काळाचिये हाती । नामा ह्मणे चित्ती दृढ धरा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग