म्हणता वाचे नाम वंदी
647.
म्हणता वाचे नाम वंदी तया यम | काळादिकासम तुज एका ॥१॥
ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती | उच्छिष्टे काढिती मुक्ति चारी ॥२॥
चारी वेद भात होऊनि गर्जती | सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणी लोळती | चरणरज क्षिति शिव बंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू | करी तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
