वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नामे सदा शुद्धि प्रा

🙏 4. संत नामदेव · ABH-083295 · अभंग क्र. ६४८

648.
नामे सदा शुद्धि प्राणिया होतसे | नामापाशी असे भुक्तिमुक्ति ॥१॥
नामा ऐसे सोपे नाही त्रिभुवनी | नाम संजीवनी साधकांसी ॥२॥
नामे भक्ति जोडे नामे कीर्ति वाढे | नामे सदा चढे मोक्ष हाता ॥३॥
यज्ञ दान तप नामे आली हाता | नामे सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥
नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखी | नाही याच्या तुकी दुजा कोणी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग