वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नामाचा महिमा नेणेचि

🙏 4. संत नामदेव · ABH-083402 · अभंग क्र. ६४६

646.
नामाचा महिमा नेणेचि पै ब्रह्मा | म्हणोनिया कर्मा अनुसरला ॥१॥
नाम हेचि कर्म नाम हेचि धर्म | केशव हेचि वर्म सांगितले ॥२॥
नाम शुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या | नामाविणे वेद आणिक नाही ॥३॥
करिता आचमन केशव नारायण | करिती उच्चारण आधी हेचि ॥४॥
लग्नाचिये काळी म्हणती सावधान | लक्ष्मी नारायण चिंतन आधी ॥५॥
देहाचिये अंती प्रायश्चित्त देती | शेवटी वदविती रामनाम ॥६॥
ऐसिया नामापरते नाही सार | गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥
करिती पितृश्राद्ध कर्म आचरती | शेवटी म्हणती एको विष्णु ॥८॥
नामे होय गति नामे होय मुक्ति | नामयाचे चित्ती रामनाम ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग