आम्हा देणे धरा सांगत
7.
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणे माझे चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न नलगे सोने ॥२॥
व्रत एकादशी द्वारी वृंदावन । कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥४॥
