देखतांचि कांता दु:खी
37.
देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला ॥१॥
बोलता तियेशी न निघती बोल । ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥
नको आता पडू मायेचिये भरी । जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥
माझी गति मज तुझी गति तुज । काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥
घरी तुझी बाळे गोजिरे गोमटी । जाऊनिया पोटी धरी त्यांसी ॥५॥
न लावी उशीर जाई वो माघारी । जंव तो दुराचारी न देखता ॥६॥
बाळा पाळण हाचि स्त्रियांचा धर्म । सां-गतसे वर्म जाई आता ॥।
७॥ माझिया प्रारब्धी होते तैसे झाले । तू का येथे बळे प्राण देसी ॥८॥
नामा ह्मणे ऐसे सांगे तिच्या हिता । प्री ते नाइकता कष्टी होय ॥९॥
