वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

नेत्री अश्रुधारा पडत

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072967 · अभंग क्र. ३८

38.
नेत्री अश्रुधारा पडती अपार । तेणे पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥
ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरू । वांचुनिया करू काय आता ॥२॥
माझिया भाराने दाटेल मेदिनी । तुह्मा आव्हेरूनि गेल्ये जरी ॥३॥
सुखाचे सांगाती होतो दोघीजाणी । दु:ख ह्मणवूनि सांडी केली ॥४॥
सांडिलिया तुह्मा देवा न मानेल । वेदशास्त्र बोल हाकारिती ॥५॥
तुजविण क्षण कंथवेना काळ । मीना जैसे जळ तैसेम आह्मा ॥६॥
तुज-विण जिणे व्यर्थ या संसारी । नामा ह्मणे खरी गोष्ट बोले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग