बंधनी गुंतला देखोनिय
36.
बंधनी गुंतला देखोनिया पती । उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥
देहाची ते आस सांडोनि लवलाही । पडे रडे कांही बोल बोले ॥२॥
ह्मणे तुह्मी आता नव जावे एकले । संगे आह्मा नेले पाहिजे जी ॥३॥
बहुता जन्मांची तुह्मा आम्हा गांठी । आता कैसी तुटी पाडितसा ॥४॥
भोम जे भोगिले स्वप्रप्राय झाली । नाही ते पुरली वासना हे ॥५॥
नामा ह्मणे विषयवासना वोंगळा । तेणे कोण्या काळे सुटिजेना ॥६॥
