हरिनाममहिमा - अभंग १
1071.
हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९
कलियुगामाजीं एक हरिनाम साचे । मुखे उच्चारिता पर्वत छेदी पापांचे ॥१॥
सर्वभावे भजा एक हरीचें नाम । मंगळा मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥
दोषी अजामेळ तोहि नामे तरला । हरिनामें गणिकेल्चा उद्धार जाहला ॥३॥
एका जनार्दनी नाम सारांचें सार । स्त्रियादि अत्यंजा एका दांचि उद्धार ॥४॥
