सेंदरींहेंदरी दैवते
4026.
सेंदरींहेंदरी दैवते । कोण ती पुजी भुतखेते । आपुल्या पोटा जी रडते । मागती शिते अवदान ॥१॥
आपुले इच्छे आणिका पीडी । काय ते देईल बराडी । कळो ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधिरा ॥धृपद॥
दासीचा पाहुनर उखिते । धणी देईल आपुल्या हाते । करुणाभाषणउचिते । हे तो रिते सतंत शक्तीहीन ॥२॥
काय ते थिल्लरीचे पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरी आदी आवसानी । क्षोभे पुरश्चरणी दिले फळ ॥३॥
विलेपने बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती अपआपणया दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥
तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचे करा चिंतन । वंदू चरण येती सकळ ॥५॥
अर्थ :
शेंदरी हेंदरी म्हणजे शेंदुर लावलेले हेंदरी दैवते अशा भूताखेतांची कोण पूजा करते ? अहो जी दैवत पोटासाठी रडतात आणि पोट भरण्यासाठी अन्न मागतात त्यांची कोण पूजा करणार आहे ? आपल्या इच्छेसाठी दुस-याला त्रास देणारे भिकारी दैवत आम्हाला काय देणार आहे ? अहो ज्याची बुध्दी अपूरी आहे आणि ज्याच्या ठिकाणी अधीरता आहे धैर्य नाही त्याची काय प्राप्ती होणार हे आम्हाला आता चांगले कळून आले आहे. जर एखादा पाहुणा आला आणि त्याने दासीच्या हाताने पाहुणचार घेण्याचे ठरविले तर त्या दासीला आपल्या मालकाला प्रथम विचारावे लागेल मग तिच्या योग्यतेनुसार मालक तिला जे हवे असेल ते देईल व त्यापुढे ती दासी पाहुण्यांच्या इच्छाप्रमाणे त्यांचा पाहुणचार करेन. अशी ही दैवते नेहमी शक्तिहीन असून मोकळीच असतात. डबक्यातील पाण्याचा काय उपयोग आहे अहो ज्या पाण्याने ओठच भिजत नाही त्या पाण्याने तहान जाईल तरी कशी ? कोणते
