विषयओढी भुलले जीव ।
4027.
विषयओढी भुलले जीव । आता यांची कोण करील कीव । नुपजे नारायणी भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरिले संसारी । पडोनि काळाचे आहारी । माप या लागले शरीरी । झालियावरी सळे ओढिती ॥धृपद॥
बापुडी होतील शेवटी । आयुष्यासवे झालिया तुटी । भोगिले मागे पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥
जुंतिले घाणा बांधोनि डोळे । मागे जोडी आर तेणेंही पोळे । चालिलो किती ते न कळे । दुःखे हारंबळे भूकतहान ॥३॥
एवढे जयाचे निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । ते हे देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥४॥
तुका म्हणे न वेंचता मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचिता फुकाचे बोल । केवढे खोल अभागिया ॥५॥
अर्थ :
विषयाच्या ओढीने सर्व जीव भुलले गेले आहेत स्वत:चे स्वरुप विसरले आहेत त्यामुळे आता यांची कीव कोण करील ? एवढा मोठा यांना नरदेह प्राप्त झाला तरी देखील यांच्या ठिकाणी नारायणाविषयी भक्तिभाव उत्पन्न होत नाही. अहो हे तर सर्व काळाच्या मुखी पडले आहेत तरी देखील या लोकांनी संसारामध्ये असे कोणते सुख धरले आहे ? अहो या शरीराला आयुष्याचे माप लागले आहे आणि ते की एकदा पूर्ण झाले की, मग यमदूत त्याच्यावर सळ ओढीत त्याला घेऊन जाईन एकदा की आयुष्याची तूट झाली मग शेवटी सर्व दीन होते. मागेही अनेक जन्मात कोटी भोग भोगले आणि पुढेही भोगावेच लागेल आणि पुन्हा जन्म घेऊन भोग भोगावेच लागेल. घाण्याच्या बैलाच्या डोळयाला पट्टी लावतात आणि बैलाने पुढे जाण्यासाठी कसर केला की तेली त्याला पाठीमागून आरी टोचतात. त्यामुळे त्याला त्रास होतो व किती चाललो हे देखील त्याला समजत नाही आणि तहान भूकेच्या दु:खाने
