वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

तूचि अनाथाचा दाता ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072955 · अभंग क्र. ४०२५

4025.
तूचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलो तुज आता । तारी कृपावंता मायबापा ॥१॥
संतसंगति देई चरणसेवा । जेणे हा तुझा विसर न पडावा । हाचि भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ॥२॥
मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्ना सोडवूनि हाती । विनंती माझी परिसावी हे ॥३॥
आणीक काही नाही मागणे । सुखसंपित्तराज्यचाड धने । साकडे न पडे तुज जेणे । दुजे भक्तीविण मायबापा ॥४॥
जोडोनिया कर पायी ठेवी माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगी वोढवावी रंगकथा । पुरवी मनोरथा मायबापा ॥५॥

अर्थ :
देवा तूच अनाथांचा दाता आहेस त्यामुळे तर दु:ख, मोह, चिंता नाश पावेल, त्यामुळे हे कृपावंता मायबापा मी तुला शरण आलो आहे तरी तू मला या भवसमुद्रातून तार. देवा मला तुझ्या चरणांची सेवा घडू दयावी आणि जेणेकरुन मला तुझा विसर पडणार नाही अशा संतांची संगती मला दयावी. देवा हाच दृढ भक्तिभाव माझ्या जीवाचा आहे माझे मनोरथ एवढे तुम्ही पूर्ण करा. देवा तुझे नाम वर्णन करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी माझ्या ठिकाणी दृढ भक्तिभाव प्रेम आणि तुझ्याविषयीचे आवड दयावी. व ह्या कार्‍यात आड येणा-या विघ्नांपासून मला तुम्ही सोडवा. एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. देवा हयावाचून माझे दुसरे काहीही मागणे नाही. मला सुख नको, संपत्ती नको, राज्य नको किंवा धनाविषयी आवडही नको हे मायबापा भक्तिवाचून दुसरे कोणतेही तुला संकट पडेल असे मी काहीही मागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा मी माझे दोन्ही कर जोडून तुमच्या चरणावर माझा माथा ठेवीत आहे व तुम्हाला विनंती करीत आहे, हे मायबापा हरीकथेचा रंग म

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग