वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

प्रकृतीचा पैठा कल्पन

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090044 · अभंग क्र. १७०

170.
प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा । न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥१॥
अहिंसेचे स्वरूप हेंचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥२॥
नाही त्यांसि जय नुद्धरे सर्वथा । हरिवीण व्यथा कोण वारी ॥३॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणे मार्गे पाहे हरि सोपा ॥४॥

अर्थ:
मी व माझे ह्या देह कल्पनेनुसार मार्गाक्रमण करणारा कधीच वैकुंठाला प्राप्त होत नाही. तो अभक्त नुसते अहिंसेचे तत्व मानतो पण सर्व जग हे हरिने ओतप्रोत आहे हे मानत नाही त्याला कधी ही जय व यश प्राप्त होत नाही. कारण हरिच सर्वसामर्थ्यशाली आहे व तोच तारणारा आहे. निवृतिनाथ म्हणतात, ज्यांने गुरुचरणाचा आश्रय धरला त्याच्यासाठी हरिप्राप्तीचा मार्ग सोपा आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग