वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(श्री ज्ञानेश्वर महा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080788 · अभंग क्र. ३३९७

3397.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकाराम महाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
माझ्या बापे मज दिधले भातुके । म्हणोनि कवतुके क्रीडा करी ॥१॥
केली आळी पुढे बोलिलो वचन । उत्तम हे गुण आले त्याचे ॥धृपद॥
घेऊनि विभाग जावे लवलह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥
तुका ज्ञानदेवी समुदाय । करावा मी पाय येईन वंदू ॥३॥

अर्थ :
माझा बाप पाडूरंग याने मला भक्तीप्रेम सुखाचा खाऊ दिला आहे त्यामुळे तर मी कौतुकाने खेळ खेळत आहे. मी त्याच्यापुढे हट्ट केला हट्टाने त्याला मला जे लागेल ते मागितले त्यामुळे तर माझ्या अंगी त्याचे उत्तम गुण आले आहेत. त्यामुळे हे ब्राम्हणा तू येथे माझ्याकडे आला आहेस तू येथील तुझा पुण्याचा वाटा तू घे आणि लवकर आपल्या ठिकाणी पुन्हा तू जावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे ब्राम्हणा मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐक तू काया, वाचा, मन, इंद्रिय, प्राण, बुध्दी यांचा समुदाय श्रीज्ञानदेवांच्या चरणांवर अर्पण कर व त्यांच्या चरणांना वंदन कर मीही त्यांच्या चरणांना वंदन करण्यासाठी येईन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग