(श्री ज्ञानेश्वर महा
3396.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचे ॥१॥
करोनि पारणे आंचवे संसारा । उशीर उशिरा लावू नको ॥धृपद॥
घरकुलीने होता पडिला अंधार । तेणे केले फार कासावीस ॥२॥
झुंगारूनि दुरी लपविले काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥
अर्थ :
अरे तू स्वत:ला देह समजून लहान का राहिला आहेस ब्रम्हांडाचे आभूषण घे म्हणजे मीच ब्रम्ह आहे असा दृढ निश्चय कर. आचमन घे आणि या संसाराचे पारणे फेडून टाक ब्रम्ह मीच आहे असे म्हण आणि असे करण्यासाठी तू फार उशीर लावू नकोस. देहभाव या अज्ञानरुपी अंधाराने तुला संसारामध्ये गुंतवून टाकले व संसाराच्या अनेक प्रकारच्या भाराने तुला फार कासावीस केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एखादयाला दान देण्यासाठी आपण पैसे बाहेर काढावेत तो जवळ आल्यानंतर पैसे झुगारुन देण्याचे नाटक करुन आपल्याजवळच काखेत पुन्हा लपवून ठेवावे त्याप्रमाणेच देवाचे हे सारे कौतुक आहे.
