संतसंगे योग संतसंगे
299.
संतसंगे योग संतसंगे याग ।
संतसंगे प्रयोग जोडे मना ॥१॥
यालागी आवडी धरावी संतांची ।
प्रत्यक्ष मोक्षाची वाट हेचि ॥२॥
संतसंगे तीर्थ संतसंगे क्षेत्र ।
संतसंगे मंत्र सिद्धि जोडे ॥३॥
बहेणि म्हणे संतसंगे जोडे ज्ञान ।
संतसंगे मन स्थिर होय ॥४॥
