रकारासे दीजे काना ।
300.
रकारासे दीजे काना ।
व्यंजनाने उच्चारणा ॥१॥
म्हणे मंत्र बीजयुक्त ।
जे का शंकराचे उक्त ॥२॥
पुढे काना रकाराने ।
करू मुखी उच्चारणे ॥३॥
तयावरी मकारासी ।
देई काना उच्चारासी ॥४॥
याला देऊनी व्यंजन ।
मग करी उच्चारण ॥५॥
मन उफराटे अंती ।
साही अक्षरी विश्रांती ॥६॥
बहेणि म्हणे न सांगता ।
मंत्र सांगितला आता ॥७॥
