हमामा भाई हुंबली । ग
215.
हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरे कान्होबा जाला ना ब्रह्मामाया बोंबली रे ॥१॥
हमामा भाई बार कोंडे । वासुरे लेकुंरें कान्होबा जाला ठकविलें ब्राह्मण चहुं तोडें ॥२॥
हमामा भाई बारकोंडा । कंआचा केशीया कान्होबा मरिला हांसता आला होऊनियां घोडा रे ॥३॥
हमामा भाई खोल पाणी । यमुनेमाझारी कान्होबा पोहतां कुटिला काळिया फणी रे ॥४॥
हमामा भाई तोंड वासी । शिंक्याचें लोटकें कान्होबा भेदिले लागली धार गोड कशी रे ॥५॥
हमामा भाई तोंड वासी॥औटचि मात्रा कान्होबा भेदिली लागली गोड कैसी रे ॥६॥
हमामा भाई चाट बोटे । चोरीचें दुध गोड मोठें ॥७॥
हमामा भाई गटगोळे । स्वर्गीच्या देवा लाळ गळे ॥८॥
हमामा भाई गट गोळी । जेविती खेळीमेळीं ॥९॥
हमाम भाई मिठी मिठी । आजचें भोजन गोड सुटी ॥१०॥
एका जनार्दनी तृप्त झाला । ब्रह्मादेव लाळ घोटी ॥११॥
