न लगो विषय गोपांच्या
216.
न लगो विषय गोपांच्या पाठी । न संडु स्वत्मा घोंगडें काठी । विषयभोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥
म्हणवोनि हुंबली बोधाची । कृष्णेची आमुची ॥धृ.॥
न टाकू प्रेम शिदोरी कुरुधनें । नेघो सायुज्य पळसपानें । विषय ताटीचें मिष्टान्न । तेणे जनार्दन न भेटें ॥२॥
ब्रह्मा सेवुं करुनी ठोमा । एका जनार्दनी गोविलें कामा । अष्ट भोग भुलवी रमा । तोही आम्हा श्रीकृष्ण ॥३॥
