वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

यत्न आता तुम्ही करा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079778 · अभंग क्र. ४०७९

4079.
यत्न आता तुम्ही करा । मज दातारा सत्तेने ॥१॥
विश्वास तो पायावरी । ठेवुनि हरी राहिलो ॥धृपद॥
जाणतचि दुजे नाही । आणीक काही प्रकार ॥२॥
तुका म्हणे शरण आलो । नेणे बोलो विनविता ॥३॥

अर्थ :
हे दातारा आता तुम्ही तुमच्या सत्तेने माझे रक्षण करण्याचे प्रयत्न करा. हे हरी तुमच्या पायावर मी विश्वास ठेवलेला आहे. देवा तुमच्यावाचून दुसरा कोणताही प्रकार मी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुम्हाला शरण आलो आहे दुसरे काहीही मी बोलत नाही केवळ माझे रक्षण करा एवढी एकच विनंती तुम्हाला करत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग