वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

बैसो आता मनी । आले त

🙏 3. संत तुकाराम · ABH-079457 · अभंग क्र. ४०७८

4078.
बैसो आता मनी । आले तैसेंचि वदनी ॥१॥
मग अवघेचि गोड । पुरे सकळ हि कोड ॥धृपद॥
बाहेरील भाव । तैसा अंतरी हि वाव ॥२॥
तुका म्हणे मणि । शोभा दावीली कोंदणी ॥३॥

अर्थ :
मुखाने जसे भक्तिज्ञान वैराग्याच्या गोष्टी करता येतात तसेच ते मनामध्येही रुजलेले असावे. मग सर्व काही गोड होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जसा आपला बाहेरील भक्तिभाव आहे तसाच प्रकारचा भक्तिभाव अंतरंगातही रुजलेला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, कोंदण करुन जसा हिरा लावल्यावर शोभून दिसतो अगदी त्याप्रमाणे भक्ति, ज्ञान, वैराग्याच्या गोष्टी आपण बाहेर बोलतो तसेच अनुभव अंत:करणातही असेल तर आपण केलेले कार्य शोभून दिसते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग