(आरत्या)
4080.
(आरत्या)
जगदिश जगदिश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ती ।
पुण्यपापविरहित सकळा अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणता सर्वथा ॥धृपद॥
आगम निगम तुज नेणती कोणी । परि तू भाव भक्ती जवळीच दोन्ही ।
नेणता विधियुक्त ईश्वराते पूजनी । न माये ब्रम्हांडी तो संपुष्टासनी ॥२॥
असुरा काळ भासे विक्राळ पुढे । पसरी मुखएक चावितो धुडे ।
भक्त शरणागता चालतो पुढे । दावी वाट जाऊ नेदी वाकडे ॥३॥
एकाएकी बहु विस्तरला सुखे । खेळे त्याची लीला तोचि कवतुकें।
तेथे नरनारी कवण बाळके । काय पापपुण्य कवण सुखदुःखे ॥४॥
सकळा वर्मा तूचि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख ।
जाणो म्हणता तुज ठकली बहुतेक । तुका म्हणे शरण आलो मज राख ॥५॥
अर्थ :
देवा तुला सर्वच जण जगदीश, जगदीश असे म्हणतात परंतू सर्व जगामध्ये सर्वत्र तू तुझ्या युक्तीने व्यापक आहेस. देवा तुझी युक्ती म्हणजे अशी आहे कि, तू तर सर्व पाप पुण्याचा आधिपती आहे सर्वत्र तू व्यापक आहे परंतू कमळ जसे पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त राहते त्याप्रमाणे तू सर्वत्र व्यापक असून देखील सर्वांपासून अलिप्त राहतोस तू सुर्याप्रमाणे केवळ सर्वत्र साक्षी रुपाने पहात आहेस. हे पंढरीनाथा तुझा त्रिवार जयजयकार असो तुझे विठ्ठल नाम घेतले असता पाप मागे शिल्लकच रहात नाही. देवा तुला वेद आणि शास्त्र हे कोणीही जाणत नाही त्यांना तू कळतही नाहीस परंतू भक्ति आणि भाव या दोन्हीही ठिकाणी तू राहात असतोस. विधियुक्त ईश्वराची पूजा कशी करावी ही ज्या भोळया भक्त भाविकाला कळत न
