अशौचिया जपो नये । आण
28.
अशौचिया जपो नये । आणिकते ऐको नये । ऐसिया मंत्राते जग बिहे ।
त्यांचे फळ थोडे परि क्षोभणे बहु । ऐसा मंत्राराज नव्हेरे रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नारायण नाम म्हण कारे ॥२॥
बाह्य उभारावी त्यावरी काहाळ लावावी ।
गातिया ऐकातिया उणीव येवो नेदावी ।
उत्तमापासूनि अंत्यजवरी । मुक्तीची सेल मागाविरे रे ॥३॥
काय कराल यागे न सिणावे योगे हे तो व्यसनची वाउगे ।
नरहरि नरहरि उदंड वाचा म्हणाल तरि कळिकाळ राहेल उगेरे ॥४॥
चरणी गंगा जन्मली अहिल्या उद्धरली नामे प्रतिष्ठा पावली गिरिजा ।
सकळिका साधना वरिष्ठ हे नाम मा मनी भाव न धरी दुजारे रे ॥५॥
तीर्थी भजिजाल अमरी पूजिजाल तुमचिया भावासारिखा देवो होईल ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुमचा ऋणवई म्हणता नलजरे रे ॥६॥
