उभा चंद्रभागे तीरीं
677.
उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनिया करी ॥१॥
रुप सावळें सुंदर । कानी कुंडले मकराकर ॥२॥
तुळसेमाळा शोभे कंठी । अंगी चंदनाची उटी ॥३॥
भक्त आनंदें गर्जती । विठ्ठल विठ्ठलउच्चरिती ॥४॥
एका जनार्दनी ध्यान । शोभे सगुण निर्गुण ॥५॥