अमृताची धार । वाहे द
3408.
अमृताची धार । वाहे देवाचे समोर ॥१॥
उर्ध्ववाहिनी हरीकथा । मुगुटमणि सकळा तीर्था ॥धृपद॥
शिवाचे जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हरी । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
अर्थ :
देवाच्या समोर उभा राहून हरीकथा करणे म्हणजे ते शब्द अमृताच्या धारेप्रमाणेच आहेत. हरीकथा ही उर्ध्ववाहिनी आहे मोक्षाकडे वाहणारी आहे सर्व तीर्थांचे ती मुकूटमणी आहे. हरी कीर्तन हे भगवान शिवाचे जीवन आहे महादोषाना जाळणारे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, स्वत: हरीच हरी कीर्तनाची मोठी स्तुती वर्णन करत असतो.
