वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

हरीकथे नाही । विश्वा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080811 · अभंग क्र. ३४०७

3407.
हरीकथे नाही । विश्वास ज्याचे ठायी ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचे बीळ ॥धृपद॥
सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥
तुका म्हणे पिसी । वाया गेली किती ऐसी ॥३॥

अर्थ :
ज्याच्या ठिकाणी हरीकथेविषयी विश्वासच नाही, त्याची वाणी अमंगळ आहे आणि कान म्हणजे उंदराचे बीळ आहे. हरीकथेसारखा अमृत रस टाकून हरीप्राप्तीसाठी इतर कष्टदायक साधने काही लोक करतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे कितीतरी वेडे आहेत की ज्यांनी हरीभक्तीचा आनंद सोडून दिला आणि हरीप्राप्तीसाठी इतर साधने केली ती वायाला गेलेले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग