वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आता माझ्या मना । इची

🙏 3. संत तुकाराम · ABH-080702 · अभंग क्र. ३४०९

3409.
आता माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसे करी गा पांडुरंगा । प्रेम वोसंडेसे अंगा ॥धृपद॥
सर्व काळ नये । वाचे विट आड भये ॥२॥
तुका वैष्णवांसंगती । हेचि भोजन पंगती ॥३॥

अर्थ :
आता माझ्या मनाला हरीकथेचीच उपासना घडावी एवढीच विनंती आहे. आणि हे पाडूरंगा ती उपासना करत असताना माझ्या अंगातून प्रेमच बाहेर ओसंडत राहावे असेच तुम्ही करा. पाडूरंगा सर्वकाळ जरी मी हरीकथा करत राहीलो तरी माझ्या वाचेला हरीकथेविषयी वीट येऊ देउ नको आणि हरीकथा करताना कोणत्याही प्रकारचे भय आडवे येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, पाडूरंगा माझी एवढीच इच्छा आहे की वैष्णवांच्या पंगतीत बसून मला हरीकथेचे भोजन मिळावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग