आणिक हे ग्रंथ प्रमाण
9.
आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशे ।
वदले स्वरसे गुरुकृपे ॥१॥
रामायण अदभूत सप्तकांड साचार ।
तव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥
समाधी सुखाचा सोहळा अपार ।
होतो जयजयकार प्रतिष्ठानी ॥३॥
निळा म्हणे एैसा ब्रहमानंद झाला ।
आनंदी लोटला आनंदचि ॥४॥
