पट्टाची मी राणी वडील
591.
पट्टाची मी राणी वडील मानाची| जे गति मृगाची तेचि मज ॥१॥
जाईन सांगाते न सोडी संगती| निश्चय हा चित्ती दृढ केला ॥२॥
तुझी बाळे घरी कष्टती क्षुधेने| जाई वेगी स्तने पान देई ॥३॥
बाळांकडे जाई पाहे कंठी काळ| न करी उतावीळ मन आता |॥४॥
नामा म्हणे ऐसे संवादले फार| तिघांचे अंतर एकविध ॥५॥
