नाम प्रल्हाद उच्चारी
23.
नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी ।
उचलुनि घेतला कडियेवरी । भक्त सुखे निवाला ॥१॥
नाम बरवया बरवंट । नाम पवित्र आणि चोखट ।
नाम स्मरे निळकंठ । निजसुखे निवाला ॥२॥
जे धुरुसी आठवले । तेचि उपमन्ये घोकीले ।
तेचि गजेंद्रा लाधले । हित झाले तयाचे ॥३॥
नाम स्मरे अजामेळ । महापातकी चांडाळ ।
नामे झालासे सोज्वळ । आपणांसहित निवाला ॥४॥
वाटपाडा कोळीकु । नाम स्मरे तो वाल्मीकु ।
नामे उद्धरिले तिन्ही लोकु । आपणांसहित निवाला ॥५॥
ऐसे अनंत अपार । नामे तरले चराचर ।
नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेविवराचे ॥६॥
