उपजोनि संसारी आपुला
22.
उपजोनि संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरी घेऊनि ठेला ।
या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे । परि काळाचे हे खाजे ऐसे नेणतु गेला ॥१॥
कामक्रोधमद मत्सराचेनि गुणे । बांधला आपण नेणे भ्रमित जैसा ।
मिथ्या मोह फांसा शुक नळिके जैसा । मुक्त परि अपैसा पळो नेणे ॥२॥
जळचरु आमिष गिळी जैसा का लागलासे गळी । पआपणापे तळमळी ।
सुटिका नाही तैसे आरंभी विषयसुख गोड वाटे इद्रिया । फळपाकी पापिया दु:ख भोगी ॥३॥
राखोंडी फ़ुंकिता दिप नलगे जयापरी । तैसा शद्ध ब्रम्हकुसरी ज्ञान न पवे ।
व्रत तप दान तीर्थ भजन वेंचिले । पोटा दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥४॥
मृगजळाची नदी दुरुनी देखोनि धावे । परि गंगोदक न पवे तान्हेंला जैसा ।
तैसे विषयसुख नव्हेचि हित । दु:ख भोगितो बहुत परि सावधान नव्हे ॥५॥
परतोनि न पाहे धांवतो सैरा । करितो येरझारा संसरींच्या ।
ज्ञानदेव म्हणे बहुता जन्मांचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रम्ही ॥६॥
