वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080783 · अभंग क्र. ३४६३

3463.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
अवघ्या पापे घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥धृपद॥
काम क्रोध मद्य अंगी । रंगला रंगी अवगुणी ॥२॥
करिता पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणीही ॥३॥

अर्थ :
सर्व पापे एकत्र येऊन शाक्त उपासक घडला आहे. हे पाडूरंगा त्याचा स्पर्श होऊन मला विटाळ होईल त्यामुळे माझ्या अंगाला त्याचा विटाळ देखील नको आहे. देवा त्याच्या अंगी काम क्रोध हे विकार जडलेले असतात मद्यपान करण्याची खोड त्याच्या अंगी असते व अनेक प्रकारचे रंगामध्ये तो रंगून गेलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, शाक्त उपासक लोक कोणत्याही प्रकारचे पाप कर्म करताना शंका मनामध्ये धरत नाहीत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग